पाच वर्षांत प्रथमच पतंजली समूहाच्या उलाढालीत घट

नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाला गत पाच वर्षांत पहिल्यांदाच नुकसान झाले आहे. 2013 पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीचे या वर्षात विक्रीत घसरण झाल्यामुळे नफ्यातही फटका बसला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या स्पर्धेत उतरल्याने आणि जीएसटीचा फटका पतंजलीला बसला आहे. मात्र आगामी काळात कंपनीची उलाढाल आणि नफा वाढण्याची शक्‍यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नैसर्गिक आणि वनौषधी उत्पादन क्षेत्रात बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्यामुळे मार्च 2018 ला संपलेल्या वित्त वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात काही प्रमाणात घट झाली आहे. जीएसटीमुळे वितरण व्यवस्थेत काही समस्या निर्माण झाल्याचा फटकाही पतंजलीला बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केअर रेटिंग्ज या संस्थेच्या अहवालानुसार, पतंजलीने जीएसटीचा वेळेत स्वीकार केला नाही. तसेच त्यासाठीच्या योग्य त्या पायाभूत सोयी आणि वितरण साखळी निर्माण केली नाही. याचा मोठा फटका बसून कंपनीची उलाढाल घटली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)