विलीनीकरणामुळे देना आणि विजया बॅंकेचे शेअर कोसळले

मुंबई – विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या बॅंकांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आज देना बॅंक आणि विजया बॅंकेचे शेअर 20 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले. मात्र बडोदा बॅंकेच्या भावावर फारसा परिणाम झाला नाही.

सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता विजया बॅंकेच्या भागधारकाला त्याच्याकडील 1000 शेअरच्या बदल्यात बडोदा बॅंकेचे 402 शेअर मिळणार आहेत. तर देना बॅंकेच्या भागधारकाला त्यांच्याकडील 1000 शेअरच्या बदल्यात बडोदा बॅंकेचे 110 शेअर मिळणार आहेत.

विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तिन्ही बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय हा बॅंकिंग क्षेत्रातला महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. यापूर्वी स्टेट बॅंकेच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. देना बॅंक, विजया बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणानंतर ही बॅंक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बॅंक ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)