महागडे आयफोनही होणार भारतात तयार

File photo

नवी दिल्ली -ऍपल कंपनी आता फॉक्‍सकॉनच्या माध्यमातून भारतात आयफोनची निर्मिती करणार आहे. त्यासाठी फॉक्‍सकॉन भारतात 2500 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे.

तामिळनाडूतील श्रीपेरूम्बुदूर येथे हा प्रकल्प सुरू केला जाणार असून या ठिकाणी आयफोन एक्‍ससारखे महागडे फोन तयार करण्यात येणार असल्याचे तामिळनाडूचे उद्योग मंत्री एम पी संपत यानी सांगितले. त्यामुळे 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फॉक्‍सकॉन चीनमधील प्रकल्पातून असे फोन तयार करीत होती. आता त्यातील काही काम भारतात आणले जाणार आहे का याबाबत फॉक्‍सकॉन कंपनीकहून माहिती देण्यात
आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)