बॅंकिंग क्षेत्र लवकरच रुळावर येणार

आगामी काळात विकासदर वाढणार: एनबीएफसीनी काळजी घेण्याची गरज

मुंबई – बॅंकिंग क्षेत्र लवकरच रुळावर येण्याचे संकेत आहेत. मात्र सरकारी बॅंकांनी त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी म्हटले आहे. कमकुवत सरकारी बॅंकांना भांडवलाची गरज आहे. सरकार ते देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिझर्व्ह बॅंकेच्या वित्तीय स्थिरता अहवालात त्यांनी म्हटले आहे, की बॅंकांकडून होत असलेली वसुली वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुत्पादक मालमत्तेत वेगाने घट होत असल्याचे वातावरण आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून याचे श्रेय इन्सॉलव्हेन्सी अँड बॅंकरप्सी कोड (आयबीसी) आणि सिक्‍युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्‍शन ऑफ फायनान्शियल असेट्‌स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्‍युरिटी इंटरेस्टस्‌ कायद्यातील दुरुस्तीला देण्यात आले आहे.

मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बॅंकांनी 40,400 कोटी रुपयांचे थकित कर्ज वसूल केले आहे. तर 2017 या आर्थिक वर्षात 38500 कोटी रुपयांची वसुली शक्‍य झाली होती. आयबीसी आणि एसएआरएफएईएसआय कायद्यासोबतच डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल आणि लोकन्यायालयांच्या माध्यमातून कर्जदात्यांनी थकित कर्जाची वसुली केली आहे.

“नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे बॅंकांकडून होणाऱ्या कर्ज वसुलीत वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंका उद्योगक्षेत्राला पुरेशा प्रमाणात कर्ज वितरण करू शकतील. सरकार करणार असलेल्या भांडवली मदतीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची परिस्थिती सुधारणार आहे.
-शक्‍तिकांत दास ,गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक.

आयबीसीच्या माध्यमातून बॅंकांना 4900 कोटी रुपये परत मिळाले तर एसएआरएफएइएसआयच्या माध्यमातून 26500 कोटी रुपये बॅंकांमध्ये परतले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने एका वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. जलद वसुलीसाठी बॅंकांच्या जोरदार प्रयत्नांसोबतच एसएआरएफएइएसआय कायद्यातील दुरुस्तीच्या माध्यमातून मालमत्तेचा तपशील न दिल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास तसेच 30 दिवसांच्या आत तारण मालमत्ता जप्त करण्याच्या तरतुदींमुळे मदत मिळाल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

त्यांनी सांगितले की बॅंकाचा प्रश्‍न संपत असतांनाच बिगर बॅंकींग वित्तीय संस्थाचा प्रश्‍न निर्माण होण्याची काळजी घेण्याची गरज आहे. या संस्थानी निधी स्विकारतांना आणि कर्ज वितरण करतांना नियमाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)