आगामी काळात ट्रॅक्‍टरच्या मागणीत घट होण्याची शक्‍यता

File Photo

नवी दिल्ली – चालु आर्थिक वर्षात टॅक्‍टरच्या मागणीत 10 ते 12 टक्‍क्‍यांची वाढ झाली. मात्र आगामी आर्थिक वर्षात म्हणजे 2019-20 मध्ये मागणीत घट होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.

ही घट अंदाजे चार ते पाच टक्‍क्‍यांनी होण्याचे अनुमान रेटिंग एजन्सीज इक्रा यांच्याकडून नोंदवण्यात आले आहे. इक्रा संस्थेच्या मते एप्रिल ते ऑक्‍टोबरच्या दरम्यान टॅक्‍टरच्या विक्रीत 14.5 टक्‍क्‍यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. चालु आर्थिक वर्षात हाच वाढीव आकडा 10 ते 12 टक्‍क्‍यांवर राहिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे ट्रॅक्‍टर उद्योगाने मागील तीन वर्षात मजबुत विक्रीचा टप्पा पार केल्याचे अनुमान इक्राने नोंदवले आहे. आर्थिक वर्ष 2015 ते 16 ते 2018-19 या कालावधीत करण्यात आलेल्या निरीक्षणातील नोंदीनुसार ट्रक्‍टरची विक्रीचा वधारण्याचा दर 16 टक्‍क्‍यांहून अधिक असल्याचे स्पष्टीकरण इक्राकडून देण्यात आले.

2019-20 मध्ये यात चार ते पाच टक्‍क्‍याची घसरण होणार असल्याचे अनुमान आहे. मार्केटमधील अनेक घटकामुळे ट्रक्‍टरच्या विक्रीच्या दरावर होणार असल्याचे म्हटले आहे. पावसाचे वातावरण व शेतीच्या कामातील घटनाचा ट्रक्‍टरच्या विक्रीवर सकारात्मक किंवा नकारात्मक बदलाचा प्रभाव होत असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)