ग्रामीण भागात दुचाकींची विक्री वाढण्याची शक्‍यता

File pic

नवी दिल्ली – आगामी वित्त वर्षात दुचाकींच्या विक्रीत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. ही वाढ आर्थिक वर्ष2018-19 मध्ये नोंदवली जाणार असल्याचे इक्राच्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. सततच्या वाढत जाणाऱ्या वाहनांतच्या खरेदीमध्ये ग्रामीण टक्का वधारणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत आहे.

गेलल्या काही वर्षापासून अनेक भागात पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे ग्रीामण भागातील लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढल्यामुळे दुचाकी आणि छोट्या वाहनांना मागणी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या उत्पादनात होत असणारी वाढ हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

ग्रामीण विभागात होत असणारी उत्पन्नात वाढ आणि लहान उद्योगात होणारी वृद्धी यामुळे येणाऱ्या काळात विक्रीत मोठी वाढ होणार असल्याचे अनुमान इक्रा या मूल्यमापन करणाऱ्या संस्थेकडून नोंदवण्यात आले आहे. दुचाकीच्या बाजारात लवकरच वाढ होण्याचा अंदाज असला तरी एप्रिल ते ऑक्‍टोबरमध्ये हीच वाढ 11.1 टक्‍क्‍यांनी झाली आहे. काही प्रमाणात यात घट झाली आहे. कारण केरळात आलेल्या महापुरामुळे त्याराज्यातील वाहना विक्रीला मोठा फटका बसला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)