“जैसे थे’ पतधोरणाचे उर्जित पटेल यांच्याकडून जोरदार समर्थन 

मुंबई: शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेने महागाई वाढण्याचीच जास्त शक्‍यता असूनही “जैसे थे’ पतधोरण जाहीर करून विश्‍लेषकांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. मात्र, सध्याच्या परिस्थितीत व्याजदर वाढ टाळणे योग्य होते, असे रिझर्व्ह बॅंकेने गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले आहे.
इंधनाच्या किंमती जास्त असल्यामुळे महागाई वाढेल, असे समजले जात होते. मात्र गुरुवारी केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क बरेच कमी केले असल्यामुळे त्या प्रमाणात महागाईवरील दबाव कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी एकूण जागतिक परिस्थिती पाहता व रुपयावरील दबाव पाहता आगामी काळात व्याजदरात वाढ होण्याचीच जास्त शक्‍यता असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटल्याच्या बाबीकडे पटेल यांनी यावेळी लक्ष वेधले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)