सरकार व रिझर्व्ह बॅंकेने जनतेच्या प्रश्‍नांना महत्त्व द्यावे : नायडू

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारदरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीत निरंतर संवाद असण्याची गरज आहे. तरच अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्‍न परिणामकारकरित्या कमी होऊ शकतील, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

भारतीय वस्त्र महासंघाच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, काही फसवेगिरी करणाऱ्या लोकांना निर्माण केलेल्या अडचणीमुळे बॅंकांसमोर सध्या भांडवल सुलभतेसारखे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यांनी अशी परिस्थिती का निर्माण केली याबाबत आपण सगळ्यानीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यात राजकारणी लोकांचा आणि उद्योजकांचाही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-

प्रश्‍न निर्माण होताना रिझर्व्ह बॅंकेने आवश्‍यक उपाययोजना किंवा देखरेख केली नाही. आता बॅंकेने भांडवल सुलभता कमी केल्यामुळे काही प्रश्‍न निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आता परस्परांना दोष देण्यापेक्षा बॅंक आणि सरकारने चर्चा करून यातून मार्ग काढण्याची गरज आहे. कोण मोठा आणि कोण छोटा असण्याचा मुद्दाच नाही. जनता सर्वांत मोठी आहे. सर्व व्यवस्था जनतेसाठी तयार झाल्या आहेत. त्यामुळे जनतेचे हित जोपासण्यासाठी आपण प्रतिष्ठेचा प्रश्‍न न करता चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयोग चालू ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ही चर्चा माध्यमांच्या व्यासपीठावर होण्याऐवजी संचालक मंडळात होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)