बेसुमार इंधन दरवाढीमुळे विमान कंपन्या अडचणीत

नवी दिल्ली: तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे भारतातील विमान वाहतूक कंपन्या (एअरलाइन्स) आर्थिक संकटात सापडल्या आहेत. यावर मात करण्यासाठी तेल कंपन्या व विमानतळांकडून आपल्याला अनसेक्‍युअर्ड क्रेडिट मिळवून द्यावे, असे साकडे कंपन्यांनी केंद्राला घातले आहे.

या संदर्भात विमान वाहतूक कंपन्यांची शिखर संस्था फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सने (एफआयआय) एक पत्र विमान वाहतूक मंत्रालयाला पाठविले आहे.तेलाचे वाढते दर व घसरणारा रुपया यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे. तथापि, प्रचंड स्पर्धेमुळे विमान प्रवास भाड्यात वाढ करणे अशक्‍य झाले आहे, अशा परिस्थितीत इंधनाचे बिल व विमानतळांचे शुल्क देणे कंपन्यांना अशक्‍य होत आहे.

-Ads-

या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या आणि विमानतळांकडून क्रेडिट मिळावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. एफआयआयचे प्रवक्ते उज्ज्वल डे यांनी या पत्राच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)