कापूस उत्पादन ठरले किफायतशीर

कमी उत्पादनामुळे अधिक भाव मिळण्याची शक्यता वाढली

मुंबई – कापूस उत्पादनात यंदा 6.78 टक्‍के घट होण्याची शक्‍यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे. यामुळे किमतीत वाढ होऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा देशात 343 लाख 25 हजार गाठी (58 लाख 35 हजार टन) कापूस उत्पादित होईल, असा सीआयएचा आधीचा अंदाज होता, पण असोसिएशनने हा अंदाज आता 340 लाख 25 हजार गाठींवर (57 लाख 84 हजार टन) आणला आहे.
असोसिएशननुसार, 2017-18 मध्ये 365 लाख गाठी (62 लाख 05 हजार टन) कापसाचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात घट होईल. मागील वर्षी 69 लाख गाठी (11 लाख 73 हजार टन) कापूस निर्यात झाला होता. यंदा ही निर्यात 53 लाख गाठींपर्यंत (9 लाख टन) घसरण्याचा अंदाज आहे.

देशांतर्गत उत्पादन व निर्यात, या दोन्हीमध्ये घट झाली, तरी त्या तुलनेत आयातीत फार वाढीची शक्‍यता नाही. यामुळेच वर्षअखेरीस कापसाच्या शिल्लक साठ्यात घट होईल. मागील वर्षअखेरीस देशात 92 लाख गाठी (15 लाख 64 हजार टन) कापूस शिल्लक होता. यंदा जेमतेम 66 लाख गाठी (11 लाख 26 हजार टन) कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. सूतगिरण्या व कापड उद्योगांकडून 324 लाख गाठींची मागणी असते, पण वस्त्रोद्योगाला नवी झळाळी येण्याची शक्‍यता असल्याने, मागणी वाढल्यास ही शिल्लक फार कमी असेल व कापसाला चांगली किंमत मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)