वाहन विक्रीवर परिणाम कायम

सिआम : इंधनाच्या प्रदीर्घ दरवाढीमुळे ग्राहकांचा हिरमोड

नवी दिल्ली  -चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व ऑटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे. वाहन उत्पादकांची संघटना सिआमने ही आकडेवारी जाहीर केली.

एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 दरम्यान देशभरात 1 कोटी 71 लाख 12 हजार 236 वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी याच काळात 1 कोटी 95 लाख 75 हजार 255 वाहनांची विक्री झाली. त्यात 14.39 टक्‍के वाढ झाली. पण यावर्षी खासगी चारचाकी वाहनांच्या विक्रीत मागील वर्षीपेक्षा फक्त 6.10 टक्‍के वाढ झाली. दुचाकी वाहनांच्या विक्रीतही फक्त 11.14 टक्‍के वाढ झाली. त्याचवेळी व्यावसायिक वाहनांची विक्री 35.68 टक्‍क्‍यांनी व तीन चाकी ऑटोरिक्षांची विक्री 31.97 टक्‍क्‍यांनी वाढली.

चालू आर्थिक वर्षात इंधन 13 ते 15 टक्‍के महाग झाले आहे. परिणामी नागरिकांनी नवीन वाहन खरेदीऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीशी निगडित व्यावसायिक वाहने व ऑटोरिक्षा यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये मध्यम व अवजड वाहतुकीच्या वाहनविक्रीत 42.80 टक्‍क्‍यांनी तर हलक्‍या मालवाहतूक वाहनांची विक्री 31.56 टक्‍के वाढली. तीन चाकी वाहनश्रेणीत सर्वाधिक 36.71 टक्‍के वाढ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)