किफायतशीर घरांच्या विक्रीत वाढ

नवी दिल्ली : 2018 साली देशाच्या रिऍल्टी क्षेत्रात सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले आहेत. स्वस्त घरांची मागणी आणि दर स्थिर राहिल्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीत तब्बल 50 टक्के वाढ झाली आहे. मात्र वर्षअखेरीस रोखीची समस्या निर्माण झाल्यामुळे गृह विक्री क्षेत्रातील मजबूत वाढ मात्र टळली आहे. तसेच घर खरेदीदारांना घरांची चावी मिळण्यास विलंब होण्याची भीतीदेखील अजूनही तशीच असल्याचे दिसून आले आहे.

मात्र, नोटबंदी आणि जीएसटी कार्यान्वयन, तसेच रेरासारख्या अत्यंत कडक कायद्याची अंमलबजावणी या पार्श्‍वभूमीवर रियल इस्टेट क्षेत्रात झालेली थोडीशी सुधारणा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आगामी निवडणुकीचा हंगाम आणि बिगर बॅंकिंग वित्तीय सेवा कंपन्यांसमोर (एनएफबीसी) असलेले रोकडीचे संकट पाहता 2019 च्या पहिल्या सहामाहीत घरविक्रीमध्ये मंदी असेल, असा अंदाज प्रॉपर्टी डीलर आणि सल्लागारांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने जर निर्मितीअवस्थेतील घरांवरील जीएसटी दर 12 टक्‍क्‍यांवरून घटवण्यास परवानगी दिली, तर दुसऱ्या सहामाहीत घरांच्या विक्रीत तेजी येऊ शकते. त्याचवेळी एनबीएफसीच्या रोकड संकटाचे निराकरण होणेदेखील तितकेच गरजेचे आहे. कारण, याच कंपन्या रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वित्तपोषण करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)