आर्थिक मागासांसाठी १०% आरक्षण ऐतिहासिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेल्या १०% आरक्षणाचे जोरदार समर्थन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “खुल्या प्रवर्गामध्ये जे नागरिक आर्थिक आघाडीवर मागास आहेत अशांसाठी हे आरक्षण महत्वाचे ठरणार आहे.”

सोलापूर येथे विकास कामांच्या उदघाटनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज येथे जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “काही लोक भाजप सरकार विषयी अनेक गैरसमज समाजामध्ये पसरवत आहेत मात्र भाजप सरकार लोककल्याणासाठी कटिबद्ध असून लोकसभेमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मांडण्यात आलेले आर्थिक मागासांसाठीचे विधेयक हे त्याचाच पुरावा आहे.”


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)