लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे ईव्हीएम मशीन्स सज्ज 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे ईव्हीएम मशीन्स सज्ज आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी सर्व ईव्हीएम मशीन्स निवडणूक आयोगाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन सार्वजनिक कंपन्यांना ईव्हीएम मशीन्स पुरवण्याचे काम देण्यात आले होते.

या सर्व मशीन्सचा पुरवठा 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचा होता. तो झाला आहे, 22.3 लाख मतदान युनिट्‌स आणि 16.3 लाख नियंत्रण युनिट्‌स निवडणूक आयोगाच्या ताब्यात दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 22.3 लाख मतदान युनिट्‌स, 16.3 लाख नियंत्रण युनिट्‌स आणि 17.3 लाख व्हीव्हीपीएटी (पेपर ट्रेल मशीन्स) युनिट्‌सचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या आणि बदली करण्यासाठी लागणाऱ्या मध्यकृत साठ्याचा (बफर स्टॉक) चा समावेश आहे. सुमारे 10.6 लाख मतदान केंद्रांवर या मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एम2 मार्क 2 मशीन्स (2006-10) नोटासह 64 उमेदवारांसाठी वापरता येतात. एका युनिटमध्ये 16 अशी 4 युनिट्‌स एका कंट्रोल युनिटला जोडता येतात. मात्र 2013 नंतर आलेल्या एम3 किंवा मार्क 3 मशीन्समध्ये 24 युनिट्‌स जोडून नोटासह 384 उमेदवारांसाठी मतदान करण्याची सुविधा आहे. निवडणूक आयोगाच्या 26 सप्टॅंबर रोजीच्या निवेदनानुसार आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी 171 टक्के मतदान युनिट्‌स, 125 टक्के नियंत्रण युनिट्‌स आणि 135 टक्के व्हीव्हीपीएटी मशीन्स मागवली आहेत.
.
सन 2,000 पासून 113 विधानसभा निवडणुकांसाठी आणि 113 लोकसभा निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन्सचा वापर करण्यात आलेला आहे. एव्हीएमच्या वापरामुळे बुथ कॅप्चरिंग बंद झाले आहे. त्याचप्रमाणे मतमोजणीस होणारा उशीर आणि त्यात होणाऱ्या चुकांचे कमी झाल्याने मतपत्रिकांद्वारे मतदानाची 17 विरोधी पक्षांनी केलेली मागणी आयोगाने फेटाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)