नवी दिल्ली: निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने “सी-व्हिजिल ऍप’ नावाच्या एका ऍपची निर्मिती केली आहे. तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत आचार संहितेचा भंग करणाऱ्या नेत्यांना आणि पक्षांना या ऍपमुळे चांगलाच लगाम बसणार आहे.
आदर्श आचार संहितेचा भंग रोखण्यासाठी आणि शांतिपूर्ण निवडणुकीसाठी निवडणूक आयोग अनेक ऍप्सचा वापर करणार आहे. त्यात काही ऍप्स निवडणूक लढवणारे उमेदवार, पक्ष यांच्यासाठी असून एक ऍप सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी आहे.
आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार उशिरा मिळणे अणि त्याच्या पुराव्यासाठी लागणारे फोटो-व्हिडिओ, साक्षीदार इत्यादीचा अभाव यामुळे यापूर्वी दोषींना शिक्षेपासून सुटका करून घेणे सहजशक्य होत होते. आणि अनेक तक्रारी खोट्याही असायच्या, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
सी-व्हिजिल ऍपचा वापर करून कोणीही आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार ताबडतोब करता येणार आहे. तक्रारकर्ता निवडणूक आयोगाला चलत-माहिती (लाईव्ह रिपोर्टिंग) देऊ शकेल. निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येईल. या क्रमांकाच्या साह्याने त्याला आपल्या तक्रारीवर काय काय कारवाई करण्यात आली वा किती प्रगती झाली हे घरबसल्या समजू शकेल. सी व्हिजिल ऍपवरून तक्रार नोंदवताच तिची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली जाईल आणि जिल्हा नियंत्रण कक्ष जलद कृती टीमद्वारा पुढील कारवाई करील.
उमेदवार आणि पक्ष यांच्या सोयीसाठीही ऍप्स केली असून फेऱ्या काढणे, शक्तिप्रदर्शन करणे, कॅंपेन कार्यालय उघडणे आदीच्या परवानगीसाठी त्यांना ऑनलाईन परवानगी घेता येईल. त्यासाठी आयोगाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0