पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर 

मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबर तर राजस्थान, तेलंगणात 7 डिसेंबरला मतदान पाचही राज्यांत 11 डिसेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी 11 डिसेंबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार छत्तीसगड मध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून तेथे 12 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोराम आणि मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तेलंगणा आणि राजस्थानला 7 डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्या पाचही राज्यांमध्ये आता निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील निवडणूकीच्या धामधुमीला आता वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्या राज्यांतील वातावरण निवडणूकमय झाले होते. पण मध्यंतरी एकत्रित निवडणुकीच्या संकल्पनेमुळे या निवडणूका पुढे ढकलल्या जातीय काय अशी शंका उपस्थित केली जात होती. तथापी एकत्रित निवडणुकांची संकल्पना आता आयत्यावेळी राबवता येणार नाही त्यासाठी पुरेशी कायदेशीर तरतूद केली जाण्याची गरज आहे असे नमूद करीत निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणुकांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच या निवडणूका होतील अशी अटकळ बांधली जात होती. ती आता खरी ठरली आहे.
या पाच राज्यांपैकी तेलंगणा राज्यातील विधानसभा मुदतपुर्व बरखास्त करण्यात आल्याने तेथे मुदतपुर्व निवडणूक होत आहे. निर्धारीत कालावधीनुसार तेलंगणात लोकसभेबरोबरच एप्रिल, मे मध्ये निवडणूक अपेक्षित होती. कर्नाटकातील विधानसभेच्या तीन जागांसाठीही 3 नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. या कर्नाटकात सत्ताधारी आघाडीला काठावरचे बहुमत असल्याने या तिन्ही पोटनिवडणुकांना महत्व आले आहे.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)