खा. उदयनराजेंनी घेतली आ. शशिकांत शिंदेंची भेट

उमेदवारीला विरोध कमी करण्याचा प्रयत्न

सातारा – राष्ट्रवादीअंतर्गत वाढता विरोध कमी करण्यासाठी खा.उदयनराजे यांनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. सातारा लोकसभेसाठी पर्यायी तगडा उमेदवार म्हणून ज्यांचे नाव पुढे येत आहे त्या आ.शशिकांत शिंदे यांची खा.उदयनराजे यांनी नुकतीच भेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, यावेळी खा.उदयनराजेंनी आपल्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नसल्याचे सांगितले तर आ.शिंदे यांनी पवारांच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होईल, असे सांगितले. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील आ.शिंदे यांच्या निवासस्थानी खा.उदयनराजे यांनी भेट देत सुरूवातीला मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर यांची फिरकी घेतली. खा.उदयनराजे व आ.शिंदे यांची बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या सोळस्कर येताच खा.उदयनराजे उठले व सोळस्करांना आपल्या खुर्चीवर बसण्याची उपहासात्मक सूचना केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खा.उदयनराजे म्हणाले, मला कोणाचाही विरोध नाही अन मी कोणाला विरोध करत नाही. मी काम राहतो एवढेच माहितीय. जे काय असेल ते आम्ही दोघे करत असतो. सगळे करत असतात. त्यातून अर्थ-अनर्थ काढण्याचे काम मिडीया

करत असते. तर आ.शिंदे यावेळी म्हणाले, निवडणूका आल्या की काही कार्यकर्ते भाजपचे काम करतात, या तक्रारी आहेत. त्या दुरूस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमदारांच्या विरोधापेक्षा कार्यकर्त्यांमधील मत भिन्नता महत्वाची आहे. त्याला कोणी तरी बंधन घातले पाहिजे. त्यामुळे पवार साहेबांचा निर्णय अंतिम असतो. तो झालेला असेल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल, असे आ.शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)