सुलभ शौचालय सुभारणीसाठी साडेनऊ कोटी

पहिल्या टप्प्यात 76 सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणार
पुणे – जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा याठिकाणी नागरिकांना शौचालय उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सुलभ शौचालय संकुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी साडेनऊ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 76 सार्वजनिक ठिकाणी ही शौचालय उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात अनेक तिर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ आहेत. त्यांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. परंतु, या नागरिकांच्या सोयीसाठी पर्यटनस्थळे किंवा मुख्य बाजारपेठांमध्ये सुलभ शौचालयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नागरिक आड्योश्‍याला लघुशंका किंवा शौचालयाला जात असल्याचे दिसून येते. त्यामध्ये महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील “अ’ दर्जाची तिर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, मुख्य बाजारपेठा आणि पालखी मार्ग याठिकाणी कायमस्वरुपी सार्वजनिक सुलभ शौचालय संकुल उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमध्ये 76 शौचालय संकुल उभारण्याचा मानस आहे.

-Ads-

दरम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्‍यांतील दोन गावे निवडण्यात येणार असून, त्याठिकाणी असलेले पर्यटनस्थळ, तिर्थक्षेत्र किंवा बाजारपेठ याठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला आणि पुरूष या दोघांसाठी हे शौचालय असणार आहे. त्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतीकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीसीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सुलभ शौचालयाची उभारणी करण्यात येणार असून, निधीसाठी डीपीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शौचालयामुळे नागरिकांची गैरसोय थांबणार असून, परिसर स्वच्छ आणि हगणदारीमुक्त गावात सातत्य राहील.
– अमर माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)