– महादेव जाधव
सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा,विलोभनीय निसर्गसौदर्याची खाण, हिरवीगर्द झाडी, रंगीबेरंगी रानफुले, डोंगरदऱ्यातून झुळझुळणारे, खळखळणारे झरे, धबधबे, विविध पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगर पायथ्याशी गर्द निळ्या पाण्याने भरलेले छोटेमोठे तलाव,धार्मिक व ऐतिहासिक स्थळे,भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावणारी शांतता सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शहरवासियांना क्वचितच मिळते. बांधकाम क्षेत्राच्या रुपाने सर्वत्र विकासाचे वारे वाहत आहे मात्र केवळ उंचच उंच इमारती म्हणजे विकास नव्हे. निसर्गाचे सानिध्य व आपली संस्कृती जपली तरच खरा विकास झाला असे म्हणता येईल मात्र असे फारसे कोठे घडत नाही. परंतु पुणेकर त्या तुलनेने सुदैवी आहेत. कारण पुर्व हवेली तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीमार्ग म्हणुन प्रसिध्द असलेला पुणे-सासवड मार्ग व मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्ग सुनियोजित विकासाच्या दृष्टीने चांगली वाटचाल करत आहे.
पुणे महापालिका हद्दीलगत पाच ते दहा किलोमीटर अंतरावर हडपसर उपनगराशेजारी असणाऱ्या पुर्व हवेली तालुक्यातील नामांकित अशा फुरसुंगी, भेकराईनगर,ऊरुळी देवाची, वडकी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, कोंढवा ही गावे धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपत विकासाचे विविध टप्पे गाठीत एका सुनियोजित अंगाने वाटचाल करत आहेत. पुणेकरांसाठी निसर्गसौदर्य जपुन ठेवण्याचा वसाच या गावांनी घेतला आहे. सर्वत्र मोठमोठ्या इमारती, मॉल्स, आयटी पार्क, संकुले उभा राहत असताना शेती व भाजीपाल्याचे आगार म्हणून या गावांची ओळख आहे मात्र या गावांनी काळानुरुप बदल पचवित आणि आजुबाजुच्या परीसराला आपल्या कवेत घेत बळकट पंखाने भरारी घेतली आहे.
विकास अन् वाहतुक व्यवस्था –
यामध्ये जगप्रसिद्ध आयबीएम आयटी कंपनी, औद्योगिक वसाहत, विविध टाऊनशिप, हॉस्पिटले,शॉपिंग सेंटर्स, गृहसंकुले,डेव्हलप केलेले प्लॅटस् आदी घटक या परीसराची यशोशिखरे ठरत आहेत. यामध्ये सासवड मार्ग व मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील गृहप्रकल्प सर्वांनाच आकर्षित करत आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये क्लब हाऊस, जीम, फिल्टर प्लॅंट, नाना-नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक, कारवॉस सेंटर, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, गार्डन, प्रशस्त पार्किगची सुविधांयुक्त घरे या परीसरात उपलब्ध आहेत.
भेकराईनगर, तुकाई दर्शन, ऊरुळी देवाची, वडकी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, कोंढवा, येवलेवाडी या परीसरात विविध बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरु आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा अशा सासवड मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही सुरु झाले आहे. तसेच वडकी येथून डोंगराच्या बाजुने जाणारा नियोजित रींगरोड होणार आहे, सोलापुर मार्ग ते वडकीपर्यत बाह्यवळण मार्गाचेही काम लवकरच सुरु होत आहे. तसेच या भागात विविध नामांकित बांधकाम व्यावसायिक व बांधकाम कंपन्यांची आगमने झाल्यामुळे परीसराचे नियोजित पध्दतीने नागरीकरण व शहरीकरण झपाट्याने होवु लागले असले तरी या भागाने धार्मिक ,पौराणिक, ऐतिहासिक व निसर्गसौदर्याचे जतनदेखील या परीसराने केले आहे. त्यामुळे या परीसरात सर्वच क्षेत्राच्या विकासास मोठा वाव आहे.
धार्मिक व पर्यटन स्थळे –
सासवड मार्ग म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग असल्याने या मार्गावरुन तीर्थक्षेत्र पंढरपुर,महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाची जेजुरी, मोरगावचा गणपती, आराध्यदैवत तुळजापुर, नारायणपुर, केतकवळे येथील प्रतिबालाजी, सासवड आदि तिर्थक्षेत्रांना याच मार्गावरुन जावे लागते.फुरसुंगी येथे पुरातन श्री शंभु महादेवाचे मंदिर,रामदरा येथील श्रीरामाचे मंदिर,उरुळी देवाची येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर, भेकराईनगरला भेकराईमाता मंदिर, नवसाला पावणारी तुकाईमातेचे मंदिर, कोंढवा येथे जगविख्यात इस्कॉन मंदिर, पुण्यधाम आश्रम, कोंढव्याचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विविध देवीदेवतांची मंदिरे आहेत.
पर्यटनासाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नागमोडी वळणांचा ऐतिहासिक “दिवेघाट’, उंचच उंच डोंगर शिखरावरील “कानिफनाथगढ’, फुरसुंगीतुन बारमाही वाहणारा मुळामुठा कालवा, मांजरीतुन वाहणारी मुळा-मुठा नदी, निसर्गसौदर्याच्या खाणीत वसलेल्या दिवेघाट व बोपदेव घाटात खळाळणारे धबधबे, हिरवेगार झाडांनी नटलेल्या पर्वतरांगा, महान पराक्रमी बाजीराव पेशवे व अद्वितीय सौदर्यसम्राज्ञी मस्तानी यांच्या अमरप्रेमाची साक्ष देणारा वडकी येथील ऐतिहासिक “मस्तानीतलाव’ पर्यटकांना व भाविकांना आकर्षित करत आहेत.
गृहप्रकल्पांना वाढता प्रतिसाद –
या परीसरातील जागांचे व जमिंनीचे भाव गगणाला भिडत आहेत.कारण या भागाचा भविष्यात होणारा सर्वांगीण विकास लक्षात घेता नामांकित बांधकाम व्यावसायिकांची पाऊले या भागाकडे वळत आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरु झाली आहेत.हे सर्व प्रकल्प सर्वसुविधांयुक्त आहेत,यामध्ये प्रशस्त रस्ते, पार्कीग, स्विमिंग टॅंक, जीम, क्लब हाऊस, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, फर्निचरसह लक्झरी फ्लॅट, शाळा-कॉलेज, दवाखाने, हॉस्पिटले, मंदिरे कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प आदि सुविधा मिळत असल्याने घर घेणारांची व गुंतवणुकदारांची ओढ
उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, मंतरवाडी बाह्यवळण मार्ग व सासवड मार्गाकडे जास्त असल्याचे दिसुन येत आहे.या परीसरात झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने मुलभुत सुविधा तत्काळ मिळत आहेत.या भागातील वाहतुकीची समस्यासुध्दा बाह्यवळण मार्ग व सासवड मार्गाच्या चौपदरीकरणामुळे संपुष्ठात येणार असल्याने या भागात घर घेण्यास किंवा गुंतवणुक करणारांचा जास्त ओढा असल्याचे दिसुन येत आहे.एकंदर या परीसराच्या विकासास मोठा वाव असल्याचे दिसुन येते.
ठळक वैशिट्ये –
विकासाला मोठी संधी आहे.
निसर्गसौदर्याची खाण आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत.
पाण्याची मोठी उपलब्धता आहे.
प्राथमिक व उच्च शिक्षणाची सोय
दळणवळणाची चांगली सोय आहे.
जागतिक पातळीवरील कंपन्या,संस्था आहेत.
ऐतिहासिक, धार्मिक व पुरातन पार्श्वभुमी आहे.
सुनियोजित विकासासाठी पोषक वातावरण आहे.