डहाणू परिसरात भूकंपाचे धक्के

ठाणे: पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्‍यात आज (रविवारी) मध्यरात्री भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता तलासरी ते चारोटीपर्यंत जाणवली, अशी माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी विवेकानंद कदम यांनी दिली.

या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे तालुक्‍यातील धुंदलवाडी हळदपाडा, दापचरी, शिसने, आंबोली, चींचले, नागझरी, वांकास वसा, करांजविरा, तलोटे, पुंजवा तसेच तलासरी तालुक्‍यातील काही गावांनी घराबाहेर राहून रात्र घालवली. या भूकंपाचे धक्के झाई तसेच चरोटीपर्यंत जाणवले. 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.25 वाजता 3.2 रिश्‍टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 3.15 वाजता 3.3 रिश्‍टरचे मोठे धक्के बसले होते. तसेच 24 ऑक्‍टोबर रोजी पहिला मोठा धक्का बसला होता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतीचे नुकसान झाले होते. गेल्या काही महिल्यांपासून डहाणू आणि तालसारी तालक्‍यांत सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्‍क्‍याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तालुक्‍यांमधील अनेकांनी गाव सोडून नातेवाईक व इतरत्र स्थलांतर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)