फिलिपाईन्सच्या मिंडानाओ बेटाला भूकंपाचा मोठा धक्का

मनिला: फिलिपाईन्सच्या मिंडानाओ बेटाला आज 6.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्यामुळे या परिसरात सुनामीसारख्या लाटांच्या आपत्तीला सामोरे जावे लागले. तथापी त्यातून फार मोठी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दवाओ शहाराच्या दक्षिणपुर्वेकडील 59 किमी अंतरावर भुकंपाचे केंद्र होते.

याच बेटाच्या शेजारी इंडोनेशिया आहे तेथे गेल्याच आठवड्यात आलेल्या सुनामी मुळे चारशे जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आजच्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या भुकंपामुळे पुन्हा फिलिपाईन्स आणि इंडोनेशियाला सुनामीचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान केंद्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या सरकारांनी आपल्या नागरीकांना किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर राहण्याच्या व समुद्रात न जाण्याच्या सुचना केल्या आहेत. नंतर आलेल्या वृत्तानुसार इंडोनेशिया आणि फिलीपाईन्सला थेट सुनामीचा धोका उद्‌भवणार नसला तरी जादा उंचीच्या लाटा तेथे उसळू शकतात असा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)