घारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील घारगावसह लगतच्या काही गावांमध्ये भुकंपाचे हादरे बसन्याचे सत्र सुरूच असून काल शुक्रवार दि. २४ ऑगस्ट रात्री ९.१८ वाजता पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालीचा एक भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर २.५ रिश्टर स्केल तिव्रतेचा सौम्य धक्का असल्याचे याची नोंद झाली असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घारगाव व परिसरातील काही गावांमध्ये शनिवारी दि. १८ ऑगस्ट रात्री साडे दहाच्या सुमारासही जमिनीतून आवाज आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. या धक्क्यांची कोणतीही नोंद नाशिकच्या भूकंपमापक यंत्रावर झाली नव्हती. त्यानंतर दि. २१ ऑगस्ट मंगळवारी सकाळी पुन्हा साडे आठ वाजल्या अगोदर ठराविक वेळेच्या अंतराने दोन धक्के घारगाव, आंबी खालसा, अकलापुर, खंदरमाळवाडी, मा ळेगाव पठार, कोठे खु, कोठे बु, माहुली, बोटा, या गावांमध्ये जाणवले. या दोन धक्क्यांपैकी ८.२२ वाजता ११५ सेकंद बसलेल्या धक्क्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे नाशिक येथील भूकंपमापन यंत्रात या धक्क्यांची नोंद झाली होती. मात्र काल शुक्रवार दि. २४ ऑगस्ट रात्री ९.१८ वाजता पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालीचा एक भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाली आहे. २.५ रिश्टर स्केल तिव्रतेचा हा सौम्य धक्का असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरात बसणारे धक्के हे सौम्य भूकंपाचे असून लोकांनी अफवांवर विश्वासन ठेवता शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)