इराणला भूकंपाचा मोठा धक्का 

तेहरान: इराणला रविवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. रिश्‍टर स्केल वर त्याची नोंद 6.3 इतकी झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी सुदैवाने प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. इमारत पडण्याच्या घटनांमध्ये 70 लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इराण मध्ये गेल्यावर्षी आलेल्या भुकंपाच्या आपत्तीत सहाशेच्यावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

रविवारी रात्री झालेल्या या भुकंपाचा केंद्र बिंदु सरपोल ए जहाब जवळ होता. हा भाग केमनशहा प्रांतात येतो. याच भागाला गेल्यावर्षीचा भुकंपाची मोठी झळ बसली होती. कालच्या धक्‍क्‍यामुळे या भागातील असंख्य भयभीत नागरीकांनी रस्त्यावर धाव घेतली असून त्यांनी तेथेच जागून कालची रात्र काढली. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की एकूण सात प्रांतात हा धक्का जाणवला. लष्करी आणि निमलष्करी दलांना भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)