#EarthHour आज तासभरासाठी दिवे बंद होणार

मुंबई : पृथ्वीच्या संरक्षणाविषयी लोकांमध्ये संवेदनशीलता वाढवण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘अर्थ अवर’मध्ये आता भारतीयही सहभागी होतात. मुंबईसह अन्य शहरांमध्येही बत्ती गूल केली जाते. Give Up to Give Back म्हणजेच ‘परत देण्यासाठी त्याग करा’ या घोषवाक्याला जागत मध्य रेल्वेनेही आपल्या मुंबईतील मुख्यालयाचे आवश्यक नसणारे दिवे मालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ अवरची सुरुवात वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने केली. जगात पहिल्यांदा २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात अर्थ अवर साजरा झाला. नागरिकांना आवाहन करून तासभरासाठी दिवे बंद केले गेले. हळूहळू जागरणाची ही लाट जगभर पसरली. जगभर पृथ्वीच्या पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता आणण्यासाठी तासभर दिवे बंद करण्याची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही अर्थ अवरसाठी अंधार केला जाऊ लागला आहे. मरिन ड्राइव्हवरील इमारतींचे दिवे तसेच गेट वे ऑफ इंडियावरील दिवे बंद केले जाऊ लागले.

आता रेल्वेनेही या मोहिमेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी जगभरातील दिवे रात्री साडेआठला मालवले जातील त्याचवेळी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीतील, बाहेरील बत्ती गूल केली जाईल. अर्थात हे दिवे विझवताना अत्यावश्यक कामांसाठी असलेले दिवे मात्र चालूच ठेवले जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)