वसुबारस पुजनासाठी सायंकाळचा मुहूर्त

पुणे : दिव्यांच्या लखलखाटाने प्रकाश पसरविणाऱ्या दिवाळीची खरी सुरुवात होते ती अश्विन कृष्ण द्वादशी, गोवत्स द्वादशीस म्हणजेच वसुबारस या सणापासून. आज, रविवारी (दि.4) वसुबारस असल्यामुळे आजपासूनच या दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. यंदा या पूजेसाठी सायंकाळी पाच ते सात हा गोरज मूहूर्त असल्याचे वेदाचार्य पं.वसंतराव गाडगीळ यांने सांगितले आहे.

गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असलेला वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांपैकी पहिला दिवस. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे गाय त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वर्षातील हा एक दिवस गाय आणि वासरू यांच्या पूजेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. हा दिवस म्हणजे ऋषि आण्‌ किृषी संस्कृतीचा एक सुंदर मिलाफ आहे. या दिवशी सायंकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. ज्यांच्याकडे घरी गाय, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातील महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. शिंगे व खुरांना हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून, गायीचे व वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो.

प्राचीन ग्रंथांमध्ये गुळाचा खडा आणि मेदूवडा हा गायीचा आवडता पदार्थ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नैवेद्यासाठी हे पदार्थ देने उत्तम असते असे गाडगीळ यांनी सांगिततले. आजकाल गोशाळांमार्फत या दिवशी वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते. ज्यांना जवळपास कुठेच गाय उपलब्ध होत नाही, ते घरच्या घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटतात व त्याची पूजा करून नैवेद्य दाखवतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)