कानाचे आजार: अशी घ्या कानांची काळजी

दुर्लक्षित कान काय म्हणतोय ते जरा ऐका… 
कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत असतो. कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात. बाहेरचा भाग फक्त ध्वनिलहरी-(आवाजाची कंपने) गोळा करून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचवतो. बाह्यकर्ण बाह्यकर्णाची रचना नरसाळ्यासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग मऊ राहतो. 
डॉ. एस. एल शहाणे 
अशी घ्या काळजी
हाडसूज – 
दीर्घकाळ चालणाऱ्या मध्यकर्णाच्या सुजेचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे कानाच्या मागे असलेल्या हाडाच्या टेंगळामध्ये सूज पसरणे. या टेंगळावर दुखरेपणा आणि वेदना आढळल्यास जंतुविरोधी औषधांनी जोरकस उपचार करावे लागतात. मात्र, तरीही आजार न थांबल्यास शस्त्रक्रिया करून त्यातला पू काढून टाकावा लागतो.
धनुर्वात-
कानदुखी, सूज यानंतर धनुर्वाताचा धोकाही असतो. कारण पूयुक्त जागी धनुर्वातातल्या जंतूंसाठी आदर्श परिस्थिती असते. हल्ली मात्र लसीकरणामुळे धनुर्वाताचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही हैड्रोजन पेरॉक्‍साईडच्या फेस येणाऱ्या औषधाचे दोन थेंब कानात टाकणे केव्हाही चांगले.
बहिरेपणा – 
मध्यकर्णाचा दाह व पू दीर्घकाळ चालल्यानंतर कानाचा पडदा व हाडांची ध्वनिवाहक साखळी यांत बिघाड होऊन बहिरेपणा येतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून पडदा व हाडांची साखळी यांची दुरुस्ती (शरीरातील इतर ठिकाणचे भाग वापरून) करावी लागते. ही शस्त्रक्रिया अवघड व खर्चिक आहे. मध्यकर्णाच्या जुनाट आजारानंतर अंतर्कर्णापर्यंत सूज जाऊन ध्वनिकोष, शंख, इत्यादी नाजूक भागांचे नुकसान होते. यामुळे त्या कानापुरता बहिरेपणा येऊ शकतो. या बाबतीत काहीही उपाय करता येत नाही. अशावेळी मध्यकर्णाची शस्त्रक्रियाही निरुपयोगी ठरते; कारण ध्वनिसंदेशवहनाचे कामच बंद पडते.
अंतर्कर्णाचे आजार; ध्वनिशंखदाह 
मध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते. अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलट्या ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्‍यक आहे. अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलट्या होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.
कानात किडा गेल्यास…
कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्‍यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो, पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो. कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्‍साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर हा किडा काढता येतो, पण तो ताबडतोब काढून टाकणे आवश्‍यक असते. साधा छोटा चिमटा वापरून किड्याचा भाग पकडून संपूर्ण किडा बाहेर काढता येईल. नंतर कान कोमट पाण्याने धुऊन टाकणे चांगले. हे न जमल्यास कानाच्या डॉक्‍टरकडे पाठवणे आवश्‍यक आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)