कानाचे आजार: कान कोरणे सावधानतेनेच

दुर्लक्षित कान काय म्हणतोय ते जरा ऐका… 
कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत असतो. कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात. बाहेरचा भाग फक्त ध्वनिलहरी-(आवाजाची कंपने) गोळा करून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचवतो. बाह्यकर्ण बाह्यकर्णाची रचना नरसाळ्यासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग मऊ राहतो. 
डॉ. एस. एल शहाणे
कान कोरणे सावधानतेनेच 
बऱ्याच व्यक्ती स्वत: अधूनमधून कानातला मळ काढून टाकतात. यासाठी पुढे गोल वाटीसारखा आकार असलेले कान कोरणे वापरले जाते. गोलसर भाग असल्याने याने सहसा इजा होत नाही. काडी किंवा पिन वापरणे मात्र धोक्‍याचे आहे. यात थोडी चूक किंवा अतिरेक झाल्यास पडदा फुटू शकतो. काडीच्या टोकास कापूस गुंडाळल्यास इजा टळू शकते. कोरताना कान कोरणे किंवा काडी कानाच्या पडद्याला स्पर्श करताच कानात विशिष्ट संवेदना होते; परंतु कानातला मळ स्वत: काढून टाकताना खूप काळजी घेणे आवश्‍यक आहे. लहान मुलांना असे करू देणे निश्‍चितपणे धोक्‍याचे आहे.
आपल्या जबड्याच्या हालचालीमुळे कानातील मळ आपोआप बाहेर ढकलला जातो. पण काही जणांच्या बाबतीत मळ कानातच अडकून राहतो. अशा व्यक्तींना कानात मळ कडक होऊन कान दुखणे, मळामुळे कान भरून ऐकू न येणे, इत्यादी त्रास होतो. ऐकू न येणे – (विशेषत: लहान वयात) या तक्रारीमागे बऱ्याच वेळा कानातला मळ हे एक कारण असते. मळाचा रंग दाट तपकिरी किंवा काळा असतो. कानात प्रकाशझोत पाडून तो सहज ओळखता येतो. मळ काढण्याचा एक सोपा उपाय करण्यासारखा आहे. आधी एक-दोन दिवस कानात ग्लिसरीन किंवा लसूण घालून गरम केलेले खोबरेल तेल किंवा मळ मऊ करणारे कानाचे औषध 1-2 थेंब टाकावे. आपण जखमेवर वापरतो ते हायड्रोजन पेरॉक्‍साईड नावाचे फसफसणारे औषध एक-दोन थेंब या कानात टाकले तर मळ लगेच मऊ होतो व सुटतो. सुटलेला आणि मऊ झालेला मळ सहज निघेल तेवढा काळजीपूर्वक काढून टाकावा. मळ आत कानाला किंवा पडद्याला घट्ट चिकटला असल्यास जोर लावू नये. त्यामुळे कानाला इजाच होईल. असा खडा झालेला मळ कानाच्या डॉक्‍टरने काढलेला बरा. यासाठी पाण्याच्या पिचकारीचा वापर केला जातो. खडा होऊ नये म्हणून झोपताना कानात तेल टाकण्याची घरगुती पध्दत अधूनमधून उपयुक्त आहे. लसूण घालून गरम केलेल्या खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब कानात टाकण्याची पध्दतही चांगली आहे, पण रोज तेल टाकण्याची पध्दत अयोग्य आहे. यामुळे कानात बुरशीची लागण होऊन खाज सुटण्याची शक्‍यता असते.
मध्यकर्णाचे आरोग्य 
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो. मध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणाऱ्या दूषित स्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा मपूफ निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.
लक्षणे 
काही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलट्या व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.
उपचार 
काही वेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून
(अ) 5 दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळ्या द्याव्यात.
(ब) ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्या.
(क) दिवसातून 4-5 वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.
(ड) कोरड्या स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन-तीन तासांनी टिपून घेण्यास नातेवाईकांना शिकवा. कापसाचा बोळा ठेवून तो भिजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले. यासाठी सलाईनच्या नळीचा टोकाचा भाग कापून वापर करता येई
(इ) चार-पाच दिवसांत पाणी/पू येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहिल्यास किंवा मेंदूसुजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.

 

कानाच्या आरोग्या संदर्भात परिपूर्ण माहिती देणारे ‘प्रभातचे’ लेख‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)