कानाचे आजार: कानाची बुरशी व बाह्यकर्ण

दुर्लक्षित कान काय म्हणतोय ते जरा ऐका… 
कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत असतो. कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात. बाहेरचा भाग फक्त ध्वनिलहरी-(आवाजाची कंपने) गोळा करून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचवतो. बाह्यकर्ण बाह्यकर्णाची रचना नरसाळ्यासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग मऊ राहतो. 
डॉ. एस. एल शहाणे 
कानाची बुरशी  
बाह्यकर्णात पू किंवा जखम झाली असल्यास कधीकधी त्यावरच बुरशीची बाधा होते. अशा वेळी कान दुखतो व घाण वासही येतो. तपासल्यानंतर कानामध्ये कागदाच्या लगद्यासारखा करड्या रंगाचा थर आढळतो. ही बुरशी असते. निस्टॅटिन नावाची बुरशीनाशक पावडर किंवा जेंशनचे औषध कानात बुरशीवर सोडावे. याने बुरशी आठ दिवसांत नष्ट होते. याबरोबर मूळ आजारावरही उपचार करणे आवश्‍यक आहे.
कानात मळ आपल्या त्वचेत तेलकट द्रव पाझरणाऱ्या ग्रंथी असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. अशाच ग्रंथी कानातही असतात. त्यातून पाझरणाऱ्या स्निग्ध पदार्थाचाच मळ तयार होतो. (या स्निग्ध पदार्थामुळे) कानात गेलेली धूळ, कचरा, त्वचेतून जाणाऱ्या पेशी, इत्यादी पदार्थ चिकटून एकत्र राहतात. त्यामुळे कान एकंदरित स्वच्छ राहतो. काही जणांमध्ये मळ तयार होण्याचे प्रमाण जास्त असू शकते.
बाह्यकर्ण अथवा कान चिडणे 
कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळ्या होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात. हे लहान वयात विशेषकरून आढळते. अस्वच्छ सुईने कान टोचल्यावर बऱ्याच मुलांना हा त्रास होतो.
कधीकधी पुळी बाह्यकर्णाच्या आतल्या अरुंद भागात होते. अशा वेळी ती बाहेरून सहज तपासणीत दिसत नाही. अशा वेळी कान दुखतो व पुळी फुटल्यावर पू येतो. असा पू आल्यावर कानात पुळी असण्याची शंका येणे साहजिक आहे. अशा वेळी कानातला पू स्वच्छ फडक्‍याने किंवा कापसाने टिपून घ्यावा. यानंतर कानाची तपासणी करावी. बऱ्याच वेळा पुळीचे तोंड स्पष्ट दिसते. लहान मुलांच्या कानाची दिशा प्रौढांपेक्षा सरळ असते. म्हणून मुलांच्या कानाची पाळी मागे ओढून प्रकाशझोत टाकल्यावर पडदा स्पष्ट दिसतो. फुटलेली पुळी नसल्यास पू पडद्यामागून म्हणजे मध्यकर्णातून येत असला पाहिजे.
प्रौढांच्या बाबतीत एका साध्या दुर्बिणीने ही तपासणी करता येते. या तपासणीत कानाच्या पडद्याला छिद्र आहे किंवा नाही याची खात्री करता येईल. पू बाह्यकर्णातून येत असल्यास मध्यकर्ण सुरक्षित आहे असा अर्थ असतो.
उपचार बाह्यकर्णात पुळी असल्यास किंवा कान चिडला असल्यास कानात जंतुनाशक थेंब (दिवसातून तीन-चार वेळा) टाकावेत. याबरोबर पोटातून (1) कोझाल आणि(2) ऍस्पिरिन या गोळ्या दिल्यास चार-पाच दिवसांत आराम पडेल. लहान मूल असेल तर ऍस्पिरिन ऐवजी पॅमॉल द्यावे. कोझाल ऐवजी ऍमॉक्‍सी हे औषधही चांगले असते. कान चिडलेला असल्यास वरील उपचाराबरोबरच रोज साबणाच्या कोमट पाण्याने धुऊन, कोरडा करून जंतुनाशक मलम लावावे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)