कराड उत्तराच्या राजकारणातील गरुडभरारी …!

मनोजदादा घोरपडे

सातारा तालुक्‍यातील मत्यापूर या गावात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या मा. श्री. मनोज भिमराव घोरपडे यांनी आपल्या मोजक्‍या काही वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत कराड उत्तरच्या राजकारणात गरूड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग होय. यांच्या पाठीमागे काही अंशी वडिलांची राजकीय पार्श्‍वभूमी असली तरी स्वतःही पहिल्यापासून आई वडिलांकडून झालेल्या आदर्श संस्कारामुळे व पहिल्यापासूनच सर्वसामान्यांच्यात राहिलेल्या मनोजदादांनी राजकारणात सक्रिय झाल्यावरही सर्वसामान्य लोकांना आपलेसे करणाऱ्या त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनी त्यांना आज डोक्‍यावरच घेतले असून कराड उत्तरमधील लोकांना निःस्वार्थी व आपल्यातला व आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आजही सर्वसामान्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

महायुतीमधून 2014 मध्ये लढलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले असूनही त्यांना मिळालेले मताधिक्‍य पाहता ही नव्या युगाची नांदी होती. हे मात्र आता त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर दिसून येत आहे. मनोजदादांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास 90 टक्के समाजकारण व 10 टक्के राजकारण हे त्यांचे गणित असल्याने ते आज नवयुवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

गेल्या साडेचार वर्षात आपल्या तगड्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण कराड उत्तर पिंजून काढला असून अनेक सामाजिक व लोकांच्या हिताची कामे त्यांच्या माध्यमातून व महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, आण्णासाहेब पाटील महामंडाळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कराड उत्तरमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या साथीत ते कराड उत्तरमध्ये विकासाची विधायक कामे केली व करत आहेत.

सातारा जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारखानदारांकडून सतत होणारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या मनोजदादांनी यावर्षी पडळ ता. खटाव येथे के. एम. ऍग्रो नावाने स्वतःचा साखर कारखाना सुरू केला असून त्याचा गळीत हंगाम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. याचा लाभ माण, खटाव, सातारा, कोरेगाव, कराड या भागातील शेतकऱ्यांना होत आहे. कारखान्यामुळे येथील शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

त्यामुळेच आज मनोजदादा घोरपडे लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहचले असून लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांच्या हाकेला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्याप्रमाणे नुसत्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला न पोहचता दु:खात पुढे व सुखात मागे हे तत्व अंगीकारत त्यांनी आपले काम सुरू ठेवले असून आजपर्यंत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन, आरोग्य शिबिर, मोफत मोती बिंदू चिकित्सा, मुला मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण, युवकांना रोजगार निर्मिती, मंदिरासाठी व अनेक सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत.

आज कराड उत्तरमध्ये त्यांनी युवकांची एक मोठी फळी निर्माण केली असून या युवाशक्तीच्या साथीने कराड उत्तरेत एक झंझावात निर्माण केल्याने अनेक छोट्यामोठ्या संघटना व त्यांचे कार्यकर्ते आज मनोजदादांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याने आज त्यांची ताकद वाढत आहे. काही वर्षापूर्वी बोटावर मोजण्याइतक्‍या कार्यकर्त्यांच्या साथीने लावलेले हे झंझावाताचे रोपटे आज मनोजदादांच्या रूपाने वटवृक्ष होत सर्वसामान्यांना शीतल छाया देण्यासाठी स्वत: मात्र उन्हात उभा राहत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीने मोठे यश संपादन करत दिल्लीत पुन्हा एकदा झेंडा फडकवला असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कराड उत्तरमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणारच हा विश्‍वास सर्वसामान्य जनतेला आहे. त्यासाठी त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ते मोलाची साथ देत असून त्यांच्या सुरू असलेल्या लोकविकासाच्या वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)