ई-मेल आणि स्पॅम मेल्स

कधीही मोबाईल ओपन केला, की नको असलेले मेल इनबॉक्‍समध्ये येऊन पडलेले दिसतात. त्यांना स्पॅम मेल्स असे म्हणतात. स्पॅम मेल्स हा दैनंदिन जीवनातला एक नको असलेला ताप! दर तासाला काही ना काही स्पॅम मेल्स आपल्या ईमेलच्या इनबॉक्‍समध्ये येऊन पडतात. डिलीट मारून कंटाळा आला तरी हे स्पॅम मेल्स काही कमी होत नाहीत. न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे येतच राहतात. हे स्पॅम मेल्स नेमके येतात कुठून? त्यांना आपला ईमेल ऍड्रेस कसा मिळतो हा एक प्रश्‍नच आहे.

सर्वात प्रथम एक धक्कदायक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे ती म्हणजे इंटरनेटवर येणारे बरेचसे स्पॅम मेल्स हे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमार्फत पाठविले जात असतात. हे ग्राहकासाठी अनावश्‍यकच असतात. यातील सुमारे 50 टक्के स्पॅम मेल्स हे फिशिंग अटॅक्‍स आणि फसवणूक करणारे संदेश असतात. यातील बहुतांश नेटवर्क भारत, व्हिएतनाम आणि ब्राझिल या देशांमध्ये कार्यरत आहेत. नायजेरियाचे स्पेक्‍ट्रानेट इंटरनेटच्या नेटवर्कमधील गुन्ह्यांच्या यादीत आघाडीवर आहे.

बोगस घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या नेटवर्कस मार्फत पाठवल्या जाणाऱ्या मेल्सद्वारे, ग्राहकांना एका खास पद्धतीनं आपल्या जाळ्यात अडकवण्याचं प्रमाण सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ करत आहेत. अशा प्रकारचे फिशिंगचे अटॅक्‍सचे प्रकार जास्त करून अमेरिकेतील खडझमधूनच केले जातात. त्याचं कारण हे आहे की या स्पॅमर्स गटाला आशियातील खडझसुद्धा सोयीच्या असतात. अनेक सायबर गुन्हेगार लोकांच्या आय-पी ऍड्रेसचं हॅक करून किंवा कॉम्प्यूटर दुसऱ्या कॉर्पोरेट नेटवर्कला जोडून स्पॅम आणि खोटे, बोगस संदेश पाठवले जातात.

स्पॅम मेल्सद्वारे केले जाणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सिक्‍युरिटीने नेटवर्कवर कंट्रोल ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, कारण या सगळ्याचं मूळ हेच आहे. हॉलंडमधील एका संशोधकाने हे सिद्ध करून दाखवलं होतं की प्रकरणांमध्ये खडझला स्पॅम आणि फिशिंगसारखे धोके वाढविण्यात नेटवर्कसचीचं जास्त मदत होते.

स्पॅम मेल्सच्या फासामध्ये अडकायचे नसेल तर सर्वप्रथम ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. कोणताही मेल आल्यास त्यातील मजकुराला बळी न पडता कामा नये. बऱ्याच स्पॅम मेल्स मध्ये ग्राहकांना फसवणारी आमिषे दाखवली जातात. त्यांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे.

– मृणाल गुरव

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)