जड पोते टाकून ई-बसची “ट्रायल”

पुणे – पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली इलेक्‍ट्रिक बस शहरात दाखल झाली आहे. सध्या तिची “ट्रायल’ घेण्यात येत आहे.

या बसमध्ये गुरूवारी 3 हजार किलो वजनाचे जड पोते टाकून क्षमता तपासण्यात आली. “ट्रायल’दरम्यान सीआयआरटी आणि पीएमपी प्रशासनाकडून बसचा परफॉर्मन्स तपासला जात असून पुढील काही दिवस “ट्रायल’ घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व पीएमपीएमएलच्या ताफ्यात सक्षम व चांगल्या बस आणण्यासाठी इलेक्‍ट्रिक बसेचा पर्याय समोर आला. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर बुधवारी शहरातील सार्वजनिक वाहतुकीत पहिली इलेक्‍ट्रिक बस दाखल झाली. नऊ मीटर लांबीची ही नॉन बीआरटी बस बीवायडी (ओलेक्‍ट्रो) कंपनीची आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर बसची चाचणी घेण्याचे काम सुरू असून तिची क्षमता तपासण्यात येत आहे. यासाठी शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी ही “ट्रायल’ घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)