“ई-बालभारती” प्रकल्प लवकरच होणार सुरू

पुणे – बालभारतीच्या “ई-बालभारती’ प्रकल्पाची लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत आगामी वर्षांत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ई-लर्निंग’ साहित्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागासाठी “ई-लर्निंग’ साहित्याची निर्मिती करण्याकरिता पूर्वी बालचित्रवाणीकडे अधिकार होते. मे 2017 नध्ये बालभारती बंद करण्यात आली. त्यानंतर 31 मे 2017 रोजी “ई-बालभारती’ची स्थापना करून बालचित्रवाणीचे काम “ई-बालभारती’ संस्थेकडे सोपविण्यात आले. बालचित्रवाणीतील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून “ई-लर्निंग’ साठीच्या साहित्याची निर्मिती करण्याची घोषणाही शिक्षण विभागाने केली होती.

बालचित्रवाणी बंद करून “ई-बालभारती’ स्थापन करण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र, याबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळालेच नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे. बालभारतीच्या वतीने “ई-बालभारती’च्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ई-लर्निंग’ साहित्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प अजून प्राथमिक टप्प्यातच आहे. याचे स्वरुप व विस्तृत आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांची नेमणूकही करण्यात येणार आहे. तज्ज्ञांकडून अहवाल आल्यानंतर हे काम कोणत्या विभागाकडून करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यानंतरच “ई-लर्निंग’ साहित्याची निर्मिती होणार आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या वापराची गरज
पाठ्यपुस्तकात नवीन तंत्रज्ञान वापरणे, ई-लर्निंग कंटेंट तयार करणे, पाठ्यपुस्तकाला “ई-लर्निंग’ची जोड देणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी कामे बालभारतीकडून होणे गरजेचे आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये “क्‍यू आर कोड’चा समावेश करण्यात आला आहे. सीएसआर निधीतून इतर संस्थांकडून हे काम करून घेण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)