शिकाऱ्याच्या तारेत अडकून बिबट्याचा मृत्यू 

रत्नागिरी  – शिकाऱ्याच्या फासात अडकून पडलेल्या एका बिबट्याला प्राण गमवावे लागण्याचा धक्‍कादायक प्रकार आज समोर आला आहे. तारेतून निसटता न आल्यामुळे भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिका-यांकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

चिपळूण तालुक्‍यात कामथे सुकाई मंदिर परिसरात झाडाला बारीक तार बांधण्यात आली होती. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या या तारेच्या फासकीत अडकला. शरीराभोवती बसलेला तारेचा पिळ अधिकच घट्‌ट होत गेल्याने बिबट्या त्यात अडकला.

-Ads-

त्यानंतर बिबट्या सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली. तारेचा पिळ त्याच्या शरीराभोवती घट्ट बसला होता. त्यातच तो भूकेने व्याकूळ झाला होता. यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

हा नर बिबट्या अंदाजे आठ वर्षांचा होता. त्याची लांबी 200 सेंटीमीटर तर उंची 70 सेंटीमीटर इतकी होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अवनी वाघीणीला ठार मारण्यावरून राज्यातील प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर चंद्रपुरात कालच तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
4 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
5 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)