अष्टपैलू खेळाडू ‘ड्वेन ब्राव्हो’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहीर केली आहे. माध्यमांशी बोलताना ब्राव्हो म्हणाला की, ‘आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 14 वर्षापूर्वी मी क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघासाठी पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. आणि मला तो क्षण अजूनही आठवतो ज्यावेळी मला विडिंजच्या संघाची मरून रंगाची टोपी देण्यात आली होती’.

ब्राव्होने पुढे म्हटले की, ‘2004 साली जुलैमध्ये इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात लाॅर्डस् मैदानावर ही टोपी देण्यात आली होती. त्यावेळी माझ्यात असणारा उत्साह आणि खेळाबद्दलचे प्रेम मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कायम ठेवले याचा मला आनंद आहे’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेस्टइंडिजचा ड्वेन ब्राव्हो याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने साऱ्या क्रिकेट जगतात आपली अोळख बनविली होती. पण इंडियन प्रीमियर लीगमुळे भारतामध्येही त्याचे चाहते वाढले. भारतामध्ये त्याचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे.

तरूण पिढीला संधी देण्यासाठी आपण क्रिकेटला अलविदा करत असल्याचे त्याने सांगितले. ब्राव्हो हा आयपीएल सहित इतर टी-20 लीगमध्ये खेळणे मात्र चालू ठेवणार आहे.

ब्राव्होची कारकीर्द खालीलप्रमाणे :

1) 40 कसोटी- 2200 धावा-86 बळी.
2) 164 एकदिवसीय -2968 धावा-119 बळी.
3)  66 टी20 – 1142 धावा- 52 बळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)