मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील चुरस दिवसेंदिवस चांगलीच रंगत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या बोरीवली पश्चिमधील प्रचार रॅलीदरम्यान काही तरुणांनी मोदींच्या घोषणा दिल्या.
यापूर्वी सुद्धा उर्मिला यांच्या मालाड येथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये उपस्थितांनी ‘मोदी…मोदी’ अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र उर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्यांनी पुरतेच याकडे दुर्लक्ष करत भाजपची खिल्ली उडवली गेल्याचे बोलले आहे. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत होत आहे. दिवसेंदिवस ही लढत चांगलीच रंगात आहे.