अत्यंत अडचणीच्या काळातही आम्ही कलम 7 वापरले नव्हते : चिदंबरम

आर्थिक स्थिती दडवण्यासाठीच सरकारचा आटापिटा

नवी दिल्ली  – आरबीआय कायद्यातील कलम सातचा वापर करून आपले निर्णय रिझर्व्ह बॅंकेवर लादण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. देशाच्या आर्थिक स्थिती बाबतची माहिती दडवून ठेवण्यासाठीच सरकारने या कलमाचा दुरूपयोग करायचे ठरवलेले दिसते आहे. अत्यंत अडचणीच्या काळातही आम्ही कधीही या कलमाचा वापर करून रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता धोक्‍यात आणलेली नव्हती असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.

आरबीआय कायद्यात कलम 7 असे आहे की त्याचा वापर करून केंद्र सरकार आपले निर्णय मान्य करायला रिझर्व्ह बॅंकेला भाग पाडू शकते. तथापी आम्ही या कलमाचा 1991, किंवा 1997 किंवा 2008 किंवा 2013 साली अडचणीच्या स्थितीतही याचा वापर केलेला नव्हता असे चिदंबरम यांनी लक्षात आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या बाबतीत कलम 7 चा वापर केला तर तरी अभुतपुर्व स्थिती असेल, त्याही पेक्षा वाईट बातमी आजच मिळू शकते असे भितीही त्यांनी या बाबतीत व्यक्त केली आहे. या स्थितीबाबत ट्‌विटरवर अनेक पोस्ट टाकून आपली प्रतिक्रीया दिली आहे. सार्वजनिक हिताची बाब म्हणून सरकारने कलम 7 चा वापर करून काही निर्णय त्यांना मान्य करण्यास भाग पाडण्याची भूमिका घेतली आहे अशी बातमी आज काही माध्यमांनी दिली होती त्या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)