ख्रिसमस दरम्यान अक्षय कुमार आणि सलमान खान यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर

मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी दबंग ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अक्षय कुमार आणि करीना कपूर खानचा ‘गुड न्युज’ हा चित्रपटही डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘गुड न्युज’ हा चित्रपट सप्टेंबर ऐवजी डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला आहे. त्यामुळे दबंग ३ आणि गुड न्युज या चित्रपटांची ख्रिसमस दरम्यान बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

दबंग ३ चे पहिले शूटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमाची शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वर येथे झाली होती. सिनेमाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले आहे. यापूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपटही २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र काही कारणामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे ख्रिसमस दरम्यान अक्षय कुमार आणि सलमान खान यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)