दुर्गेश पाठक यांची आपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती

नवी दिल्ली-आम आदमी पक्षाने (आप) आज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक प्रभारीपदी दुर्गेश पाठक यांची नियुक्ती केली. ते पंकज गुप्ता यांची जागा घेतील. पाठक यांच्याकडे याआधी जम्मू-काश्‍मीर प्रभारीपदाची जबाबदारी होती.

ते आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याशिवाय, आपच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या राजकीय व्यवहार समितीचेही ते सदस्य आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आप सज्ज होत आहे. त्यातून पक्षाने संघटनात्मक फेरबदल हाती घेतल्याचे मानले जात आहे. त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांच्या प्रभारींचीही नियुक्ती केली. तेच लोकसभा निवडणुकीत आपचे उमेदवार असतील, असे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)