दिल्ली-भागलपूर एक्‍स्प्रेसवर दरोडा

बिहार: दिल्ली-भागलपूर एक्‍स्प्रेसमध्ये चाकू हल्ला करीत प्रवाशांना मारहाण करत दरोडा पडल्याचे वृत्त आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने प्रवाशांना मारहाण करीत मोठी लूट केली आहे. यात सुमारे 25 लाख रुपये, दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी लांबविला आहे. ही घटना लखीसराई जिल्ह्यातील धनौरी-काजरा भागात घडली.

नवी दिल्ली-भागलपूर 12350 या एक्‍स्प्रेसची आपत्कालीन चेन ओढून गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवण्यात आली. त्यानंतर सुमारे एक तास ही एक्‍स्प्रेस येथेच थांबवण्यात आली. दरम्यान, दरोडेखोरांनी प्रवाशांची लाखोंची संपत्ती लुटून नेली. त्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. त्यानंतर एक्‍स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांचे डीसीपी सियाराम प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, एक्‍स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवाशांकडे चौकशी करुन आरोपींची ओळख पटवण्यात येणार असून त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)