व्हाॅटस्-अॅपवरील छायाचित्रावरून दोन मित्रांमध्ये शस्त्राने मारहाण

नगर – व्हॉटस-ऍपवर छायाचित्र टाकण्याच्या कारणावरून मांजरसुंबा (ता. नगर) येथे मित्रांमध्ये धारदार शस्त्राने मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन मधुकर (वय 26, रा. मांजरसुंबा) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी काळू प्रकाश वाघमारे ऊर्फ अमोल (रा. मांजरसुंबा, ता. नगर) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

अमोल हा फिर्यादी सचिनचे व्हॉटस-ऍपवर छायाचित्र अपलोड करत होता. सचिनने याला विरोध केला. तरी देखील अमोल छायाचित्र अपलोड करत होता. सचिनने छायाचित्र टाकण्यास मज्जाव केला. त्यातून अमोल आणि सचिन याच्यामध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या. अमोल याने फिर्यादी सचिन याच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करून करून जखमी झाले. अमोल आणि सचिनच्या मारामाऱ्या सोडविण्यासाठी सुनील लक्ष्मण शेंडगे याने मध्यस्थी केली.

अमोल याने सुनील याच्यावर देखील हल्ला चढविला. सुनील याच्या डोक्‍यात अमोल याने त्याच धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केले. या मारामारीनंतर अमोल याने तेथून पळ काढला. जखमी सचिन आणि सुनील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)