कलेतही इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या यशामुळे भारावलो -मयूरेश पिंपरकर

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत स्नेहसंमेलन ऱ्हिदम 2019 संपन्न

नगर: प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेली कला हि एक ईश्‍वरी देणगी आहे. अभियांत्रिकीतील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच कला, क्रिडा, सांस्कृतिक स्पर्धेत त्यांनी मिळविलेली बक्षीसे त्यांच्यामधील सुप्त गुणांची पावती आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे मी अक्षरक्ष: भारावुन गेलो, असे प्रतिपादन पुणे येथील कोकबण ऍटोमेशन प्रा.लि.चे संचालक मयुरेश पिंपरकर यांनी केले.

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन – रिदम 2019 पार पडले. यावेळी कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रमात मिळविलेल्या विविध स्पर्धामधील विद्यार्थींनी – विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी फौंडेशनचे विश्‍वस्त ऍड.वसंतराव कापरे हे होते. व्यासपीठावर औरंगाबादचे गरवारे पॉलिस्टर लि.चे मॅनेजर अनुभव बिर्ला,डेप्युटी डायरेक्‍टर टेक्‍निकल सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक आदि उपस्थित होते.

यावेळी अनुभव बिर्ला ऍड.वसंतराव कापरे यांची भाषणे झाली. प्रास्तविकात प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी महाविद्यालयाचा विस्तार कसा होत गेला याचा उहापोह केला. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमात असंख्य मुलांनी सहभाग घेतला. याबरोबरच असंख्य विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर केला. यामध्ये नाटीका, गाणी,नृत्य इत्यादींचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.पंकज औताडे व व्हाईस प्रेसिडेंट जिमखाना प्रा.अजित लावरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थी प्रतिनीधी शिवशंकर होंडे, श्रेयस आळकुटे, साहिल जाधव, पंकज गरकल, कुलदीप शेळके, प्रशांत त्रिंबके, आशुतोष जोशी व विद्यार्थीनी प्रतिनिधी श्रृती देशपांडे, प्रियंका बोरसे व मोनाली निंबाळकर व महाविद्यालयातील इतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिनीधित्व केले.तसेच शिवराज सौदे, वैष्णवी माळवे, भाग्यश्री बोरसे, सैफअलि खान, हर्षवर्धन गार्डे, प्रतिक यांनी सुत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)