सिग्नलमनच्या तत्परतेमुळे रेल्वेचा अपघात टळला 

भुवनेश्वर : ओदिशा येथील रायगडा जिल्ह्यामध्ये आज सिग्नलमनच्या तत्परतेमुळे रेल्वेचा अपघात टळला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुवनेश्वर-जगदलपूर हिराखंड एक्सप्रेसच्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेले असल्याचे सिग्नलमन बैष्णव गौडा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने स्टेशन प्रमुखाशी संवाद साधत रेल्वे थांबविल्याने एक मोठा अपघात होण्यापासून भुवनेश्वर-जगदलपूर हिराखंड एक्सप्रेस बचावली.

बिष्णव गौडा यांनी या घटनेबाबत सांगताना म्हंटले की, “रेल्वे दुरून येत असल्याचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की आज नेहमीपेक्षा रेल्वे रूळ मोठ्या प्रमाणात आवाज करत आहे, यामुळे मी रेल्वे रुळांचे परीक्षण केले असता रेल्वे रुळाला तडे गेले असल्याचे समजले. त्यानंतर मी तातडीने स्टेशन प्रमुखांशी संवाद साधून रेल्वे थांबविण्यास सांगितले.”


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)