आजारी सोनू निगमच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

बॉलिवूड गायक सोनू निगम सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याच्या चाहत्यांना कळवत असतो. नुकताच सोनू निगमने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्याचा एक डोळा सूजल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्या कारणामुळे ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या या फोटोकडे बघितल्यावर त्याला एखाद्या मारामारीत मार लागला असावा, असे वाटते. मात्र त्याने स्वतःच या पोस्टमधून आपल्या आजारपणाचा खुलासा केला आहे.

ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सोनूने मासे खाल्यामुळे त्याला ऍलर्जी झाली. त्यामुळे सोनूला नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनू निगमने सांगितले की, जर तुमच्याकडे शिकण्याची इच्छा, विनम्रता असेल तर तुम्ही तरुण कलाकारांकडून शिकू शकता. आपण आपल्या मनाला काहीतरी नवीन शिकण्याच्या तयारीत ठेवायला हवे. “हमारे समय में सब बढ़िया था’ असे बोलणारे लोक कधीही आनंदी जीवन जगत नाहीत. असे सोनू निगम याने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)