जमिनी ट्रस्टच्या नावे असल्याने शेतकरी योजनेपासून वंचित 

वावदरेच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा – वावदरे, ता. सातारा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी श्रीरामदास स्वामी संस्थान, चाफळ, सज्जनगड या ट्रस्टच्या नावे केल्याने त्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी पात्र असतानाही वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित ट्रस्टच्या नावे त्यांच्या जमिनी केल्याने मालकी हक्कातून वगळून इतर हक्कात नावे टाकली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येईना झाला आहे. त्यामुळे भूधारक शेतकरी असल्याचा दाखला मिळावा, इतर हक्कात घालण्याऐवजी मूळ मालक म्हणून सदरी नोंद करावी, आपले सरकारकडून किसान सन्मान योजनेसह सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी होवून योजनेचा लाभ मिळावा, देवस्थान जमिनविषयी शासनांने प्राधान्याने दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)