उन्हाच्या तीव्रतेने विहिरींची पातळी घटली 

आंबेगाव तालुक्‍यातील पूर्व भागात बटाटा पीक धोक्‍यात 

लाखणगांव – आंबेगाव तालुक्‍यातील पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, पहाडदरा, शिरदाळे इत्यादी गावांमध्ये शेतकरी पावसावर पिके घेतात. या गावांत मागील अनेक दिवसांपासून पाऊस न पडल्याने शेतात केलेली उभी पिके जळू लागली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या या भागातील अनेक शेतकऱ्यांनी बटाट्याचे पीक घेतले आहे. या पिकासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, सध्या बटाटा पीक पाण्याअभावी जळू लागले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.

पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांची तरकारी पिके आणि गुरांचा चाराही जळू लागला आहे. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ लागली असून गुरांना चारा कोठून उपलब्ध करायचा, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. येणाऱ्या काही दिवसांत या ठिकाणी पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)