मुंबईतील दुहेरी बॉंबस्फोटातील आरोपीचा कारागृहात मृत्यू

नागपूर : 2003मध्ये मुंबईतील दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम याचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घडामोडीमुळे कारागृह आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून हनिफ नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. गेल्या काही दिवसांपासून हनिफची प्रकृती खालावली होती. शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक ढासळली. कारागृहात प्राथमिक उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारण न झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती कारागृहाचे निरिक्षक राणी भोसले यांनी दिली.

या प्रकरणाची माहिती पोलिसांनी तातडीने गृहमंत्रालय, मुंबई पोलीस प्रशासन तसेच हनीफच्या नातेवाईकांना दिली. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती मिळते. दरम्यान, मृत हनिफच्या मृतदेहावर नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात इनकॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
हनीफ हा मुळचा मरोळ नाका, अंधेरी (ईस्ट) येथील रहिवासी होता.

हनीफ आणि त्याच्या दहशतवादी साथीदारांनी मुंबईच्या झवेरी बाजारात 25 ऑगस्ट 2003 ला बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 52 निरपराधांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 244 जण गंभीर जखमी झाले होते.

हा बॉम्बस्फोट घडवून आण्यात हनिफ सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने हनिफ, त्याची पत्नी जायदा सय्यद तसेच अशरफ शफिक या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2012मध्ये येरवडा कारागृहातून त्याची रवानगी नागपूरच्या कारागृहात करण्यात आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)