अटलजींच्या निधनामुळे सिनेसृष्टीतून व्यक्त होतेय हळहळ

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतासह जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अटलजी त्यांच्या संयमी भाषणांसह त्यांच्यातील कवीमनासाठी देखील ओळखले जायचे. त्यांच्यातील कवीने अनेकांना नवीन उमेद दिली होती. त्यांच्या कविता कधी सद्य परिस्थितीवर बोलायच्या तर कधी जीवनाचा अंतिम सार सांगून जायच्या. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीमधून देखील दुःख व्यक्त होत आहे.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान अश्या आघाडीच्या अभिनेत्यांनी या कवी मनाच्या नेत्याच्या निधनावर शोक प्रकट केला आहे. शाहरुख खान याने ट्विट कारत अटलजींच्या एका जुन्या कवितेचा व्हिडिओ शेअर केला. त्याचबरोबर त्याने सांगितले की, अटलजींची दिल्ली येथील भाषणे  ऐकणे हे त्याच्या वाढत्या वयातील नित्याचे होते. त्याचे वडील त्याला नेहमी अटलजींची भाषणे ऐकण्यास घेऊन जात असत.

-Ads-

शाहरुख ट्विटमध्ये म्हणाला, “अटलजींना घरी सर्वजण ‘बापजी’ म्हणत, त्यांच्या निधनाने भारतीय जनतेने पिता समान नेता गमावला आहे. मी वैयक्तिक माझ्या लहानपणाच्या आणि वाढत्या वयातील आठवणीचा एक भाग गमावतात आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)