बाबरी पतनाच्या स्मृतिदिनानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

अयोध्या: अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे अयोध्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाबरी ढाचा पाडला गेल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या राममंदिराच्या उभारणीच्या मुद्दयावरून राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. त्यामुळे अयोध्येच्या परिसरात आणि गल्लीबोळातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आजचा दिवस “शौर्य दिवस’ आणि “विजय दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. नागरिकांनी आज घरोघरी पणत्या लावाव्यात आणि दिवाळीप्रमाणे प्रकाशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर मुस्लिम संघटनांनी आजचा दिवस “यम ए गम’ (दुःखाचा दिवस) म्हणून “काळा दिवस’ पाळण्याचे ठरवले आहे.

-Ads-

दोन्ही बाजूंकडून अशाप्रकारच्या घोष्सणा दरवर्षीच केल्या जात असतात. अयोध्येत 25 नोव्हेंबरला झालेल्या धर्मसभेमध्ये राममंदिराच्या उभारणीचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्‍त करण्यात आला. त्यामुळे स्फोटक बनलेल्या वातावरणात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने सुरक्षा वाढवली आहे.

सुमारे 2,500 हजार पोलिस कर्मचारी, शीघ्र कृती दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्याही अयोध्येत तैनात करण्यात्‌ आल्या आहेत. वादग्रस्त भूभागाच्या बाजूला आणि हनुमानगढी भागाच्या भोवताली बहुस्तरिय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. फैजाबाद- अयोध्या रस्त्यावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व वाहने, हॉटेल आणि धर्मशाळांची तपासणी केली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली गेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)