इंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा 

नवी दिल्ली: आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या (एटीएफ) दरात सुमारे 11 टक्‍क्‍यांच्या कपातीची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये एक किलो-लिटर जेट फ्यूअलची किंमत अनुक्रमे 68,050 रुपये आणि 67,979 रुपये झाली आहे. मागील महिन्यात हीच किंमत अनुक्रमे 76,380 रुपये आणि 76,013 रुपये इतकी होती.

जेट फ्यूअल ब्रेंट पूडशी संबंधित असल्याने विमान उड्डाण मंत्रालय दीर्घकाळापासून याला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करत आहे. विविध राज्यांमध्ये यावर लागू असणाऱ्या विविध करांपासून दिलासा मिळावा, यासाठी ही मागणी होतेय. भारतात देशांतर्गत उड्डाणांसाठी जेट फ्यूअलचा दर जगात सर्वाधिक आहे, असे बोलले जाते.

-Ads-

आम्ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दोन सूचना केल्या आहेत. एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणले जावे तसेच विदेशात सेवा प्रदा करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या विमानांना इनपूट टॅक्‍स क्रेडिट दिले जावे, अशा मागण्या केल्याची माहिती केंद्रीय सचिव आर.एन. चौबे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)