कोळशाच्या अभावामुळे वीज निर्मितीवर परिणाम शक्‍य 

कोलकाता – कोल इंडियाकडील कोळसा साठा कमी होऊन जवळजवळ 3.1 कोटी टन झाला आहे. त्यातील थर्मल विद्युत निर्मिती केंद्रांसाठी 18 दिवसांचा पुरवठा होणार आहे. विद्युत केंद्रातील कोळशाचा साठा कमी होऊन फक्त 6 दिवसांची गरज भागणार असून तो सेंट्रल इलेक्‍ट्रिसिटी ऍथॉरिटीच्या नियमापेक्षाही कमी आहे. शिल्लक साठा कमी झाल्यामुळे सीआयएलला मागणी पूर्ण करण्याच्या दबावाला तोंड द्यावे लागत आहे.

नियमानुसार विद्युत निर्मिती केंद्राकडे कमीत कमी 21 दिवसाच्या इलेक्‍ट्रिसिटी जनरेशनसाठी कोळसा उपलब्ध हवा असतो. पण 28 विद्युत निर्मिती केंद्रांकडे कोळशाचा साठा एक आठवडयापेक्षाही फारच कमी आहे. सीआयएलने एप्रिल ते ऑक्‍टोबरच्या दरम्यान 30.62 कोटी टन कोळसा उत्पादित केला त्यावेळी कंपनीने आपल्याकडील 34.08 कोटी टनाची विक्री केली आणि त्यामुळे कंपनीला थर्मल विद्युत केंद्राकडील वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी माइन पिट हेड स्टॉकचा वापर करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)